![]() |
त्रिशरण बहुउद्देशीय संस्था कळाशी द्वारा संचालित शाखा राजुरा सरोदे येथे वैशाखी बौद्ध पौर्णिमा दिनांक 12 मे 2025 रोजी आयोजक श्री दिनेश सहदेवराव वानखडे यांच्या कडून एक हजार लोकांची स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून समाज क्रांती आघाडी चे अध्यक्ष माननीय श्री हंसराजजी शेंडे साहेब उपस्थित होते तथा प्रमुख अतिथी म्हणून आयु. श्री. विनोद किर्दक हे उपस्थित होते, याप्रसंगी हंसराजजी शेंडे यांच्या हस्ते MBBS साठी निवड झालेला विद्यार्थी आनंद संतोष पळसपगार यांचा सत्कार करण्यात आला व मार्गदर्शन करतांना बोधगया बौद्ध विहार या संदर्भात भारतीय संविधानाचे अनुच्छेद 13 चे अभ्यासपूर्ण विश्लेषण करून बौद्धांचे स्वयंम कायदे व्हायला पाहिजे असे सुचविले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आयु. नंदलालजी वरघट, दर्शन वरघट, शेखर वरघट, प्रमोद इंगळे, ॲड. रोशन जामनिक, शशिकांत भगत, भूषण नितनवरे, सुभाष नितनवरे, जयसिंग भगत, मुंगूटराव भगत, नागोराव बनसोड, संजय भाऊ वानखडे, श्वेता पळसपगार, अनिता सुभाष भगत, राजेश वानखडे, सिद्धार्थ किर्दक, करण किर्दक यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम अतिशय उत्साहाने पार पडला.